के.जे. मेहता प्राचार्याचा संदेश

         एक यशस्वी प्रयत्न करताना अडथळे म्हणून जीवनात येत असतातच . प्रयत्नानेअडथळ्यावर मात करत करत आपणास यश मिळवायचे असते. आपल्या प्रामाणिक प्रयत्नाने उत्कृष्ट कार्यासाठी सदैव जागरूक राहून प्रयत्न करावे लागतात.  भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक पातळीवर संतुलनास प्राधान्य देणे क्रम प्राप्त ठरते. एक प्राचार्या म्हणून काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या व शिकवाव्या पण लागल्या.
       के मेहता हायस्कूल हि एक आपली जिल्ह्यात नावाजलेली शाळा आहे. येथे विद्यार्थी सुरक्षितपणे व अत्यंत  खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध रीतीने आपला संपूर्ण विकास साधण्यास पूरक असे वातावरण दिले आहे. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाची  वाढ व गुणवत्तेशी लढा देण्यास वचनबद्ध आहे. आम्ही शिक्षण अनुभवांची निर्मिती करून ,समाजाच्या जास्त अपेक्षा आहेत आणि विद्यार्थी समाजातील उत्पादक सदस्य होत त्यांच्या क्षमता ओळखण्यास सर्व विद्यार्थ्यांना आव्हान पेलण्यास सक्षम बनवतो. पालक व  शिक्षक यांचे एक संघ प्रयत्न, विद्यार्थी घडविण्यास आवश्यक असतात.
         आम्ही आमच्या विद्यार्थांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहित करतो. के.जे. मेहता हायस्कूल येथे तज्ञ शिक्षक वर्ग असून कृतियुक्त शिक्षणावर भर देत आहोत. आम्ही गुणवत्ता, उद्दिष्टे आणि एकूण दर्जा व्यवस्थापन संकल्पना अनुसरण, ध्येय साध्य करण्यासाठी पारदर्शक कार्य करता आहे. आम्ही लक्ष आधारित कार्यप्रणाली वापरून विद्यार्थ्याना घडविण्याचे कार्य करत आहे. त्यासाठी अध्ययन अनुभूतीवर भर देत आहे. आम्ही  संमेलने आणि क्रीडा स्पर्धा द्वारे सर्वांगीण विकास साधत आहोत.. आम्ही आमची शाळा ही  गरीब पालकांच्या मुलांना  शिक्षणाची सोय करून देते याचा खूप अभिमान आहे. शाळा पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. शाळा बोर्ड परीक्षेत उत्तम परिणाम देऊन रेकॉर्ड सेट केले आहे. .
             आम्ही तुम्हाला चांगले नागरिक तयार करण्यास सर्वोतोपरी प्रयत्नरत आहे. आपणा सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे.
                                                                                 प्राचार्या . श्रीमती गायधनी एस. एन.